Reading in the free time - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 12, 2017

Reading in the free time

"वेळ काढून वाचण्यासारखे "
 एका पित्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं.
खूप चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण केलं जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत झाली . 
काही काळानंतर तो मुलगा एक यशस्वी व्यक्ती बनला आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा  सी.ई.ओ. बनला.
उच्च पद , भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा त्याला कंपनीकडून प्रदान झाल्यात.
काही दिवसांनी त्याचा विवाह एका सुलक्षणी कन्येशी झाला त्याला मुलंही झाली. त्याचा आपला सुखी परिवार बनला.
वडील अाता म्हातारे होत चालले होते.
एक दिवस वडीलांना आपल्या मुलाला भेटायची  इच्छा झाली आणि ते मुलाला भेटायला त्याच्या ऑफिस मध्ये गेले.
त्यांनी बघितलं की y मुलगा एका मोठ्या व शानदार ऑफिसचा अधिकारी बनलाय. त्याच्या  ऑफिसात हजारो कर्मचारी त्याच्या अधीन राहून काम करता आहेत.
हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !
ते म्हातारे वडील मुलाच्या कॅबिन मध्ये गेले व त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले.
आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलाला विचारलं की,
"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगा स्मित हास्य करत प्रेमानं म्हणाला ,
"माझ्याशिवाय कोण असू शकत बापूजी?"
वडीलांना त्याच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की त्यांचा मुलगा गर्वाने म्हणेल की,  "बापूजी, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!"
त्यांचे डोळे भरून आलेत. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले.
त्यांनी परत एकदा वळून मुलाला विचारलं की,  परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगा ह्या वेळेस म्हणाला की,
"बापूजी, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ! "
वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,
"अरे आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतास आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगतो आहेस " ?
मुलागा हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलला ,
"बापूजी त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या मुलाच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर तो मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना?  हो की नाही बापूजी " !
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलाला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."
खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती  जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो. 
सदैव थोरांचा सन्मान करा,
आपल्या यशामागे तेच आहेत. 
आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा सगळे जळत असतात तेव्हा फक्त आई वडीलच आपल्या प्रगतीवर खुश असतात.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here