savitribai phule - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 12, 2017

savitribai phule

क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीआई फुले यांच्या १८६ व्या जयंती दिनी कोटी-कोटी प्रणाम !!
*******"**"*****************
क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीआई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यरत्न आणी १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९ वर्षाच्या असतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाह
झाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड मारीत, शिव्या देई, शेनाचे गोडे आंगावर फेकीत त्यांच्या चरित्रावर संशय घेई पण सावित्रीआईने सगळा छळ त्रास शांतपणे सोसून शिकवण्याचे महान कार्य चालुच ठेवले.अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय सावित्रीआई जोतीबा फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणिक कार्याचा सपाटाच लावला १८५२ ला १८ शाळा कहाडुन नवे शिक्षणशास्त्रातिल अनेक मुलगामी विचार आपल्या अनुभवातुन मांडुन कार्याची सुरुवात केली .पालकांना भेटुन समजुत काढुन संख्येत वाढ करुन मुलींच्या शाळेची परिक्षा घेऊन शिक्षणातिल प्रगती बुध्दीमत्ता पाहुन पालक समाधानी झालेत हजेरी वाढु लागली त्यामुळे ज्योतीबांनी त्यांना पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनविल त्यांनी शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती. त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते.त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्ध सावित्रीआई व जोतिबा फुले यांना जाते.
पुणे शहर व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका बनल्या.त्यांनी सर्व
विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणायाचे पहिले संचालिक होत.सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी बुधवार पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या
शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका .गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला (मध्यंतर जेवण ) देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापीका आज सरकार ४ वर्षा पासून अपल्याकडे हा उपक्रम राबवीत आहे.
प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
 शुद्र अतिशुद्रांच्या मुलांचा
शैक्षणिक विकास व्हायचा झाल्यास त्याच समाजातील शिक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे त्या काळात असे शिक्षक मिळणे अशक्य होते म्हणून सावित्रीआईने शाळेत शिकवण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतले.त्यांची सहकारी फातिमा शेख होत्या सावित्रीआई नी समाजातुन व परिस्थितीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर बरे-वाईट परिणाम संबंधितांच्या शिक्षणावर होतो समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक व प्रशिक्षित असलेला एक नॉर्मल स्कुल काढले.
 त्या वेळी इंग्रज सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.
नुसत्या शिक्षणाच्या शाळा उघडण्याने सावित्रीआई आणी जोतीबांना समाधान वाटत नव्हते तर समाजातिल बालविधवांचे जिणे,कुमारी मातांची स्थिती त्यांना अस्वस्थ करित होती एक ब्राम्हणविधवा स्त्रीला पुरुष वासनेची शिकार बनून गरोदर असलेली नदीत उडी घेण्यापुर्वी जोतीबांनी वाचविले तिची समजूत घालून,धिर देऊन जोतीबांनी तिला आपल्या घरी घेऊन आले त्या काशीबाईस सावित्रीमातेच्या हवाली केले त्या मातेने तिची निट काळजी घेऊन तिचे बाळंतपण केले जन्मलेल्या बाळाचे नाळ स्वतःच १४ दिवसात कापून त्याचे नाव "यशवंत" ठेवले. वाट चुकलेल्या बालविधवांची जी केविलवाणी स्थिती होती त्यावर विचार करुन जोतीबा व सावित्रीआई यांनी १८५३ ला "बालहत्या प्रतिबंधक गृह" ची स्थापना उस्मान शेख यांच्या बखळीत केली व जाहीरात केली " कोणा विधवेचे चुकीने वाकडे पाऊल पडुन ती गरोदर राहिली तर तिने या गृहात येऊन गुपचुप बाळंत होऊन जावे" ते देशातले पहिले बालहत्या प्रतिबंधक होय.
जोतीबांनी व सावित्रीआईनी विधवा स्त्री काशीबाई च्या मुलास दत्तक घेऊन अतिशय प्रेमाने वाढवले आपले समाजिक कार्याचे व्रत या मुलाने पुढे चालवावे म्हणून त्याला डॉक्टर केले पुढे यशवंत चा विवाह जातीबाहेर च्या मुलीशी लावून भारतात पहिला अंतरजातीय मिश्र विवाह घडवून जाती जोडण्याचे कार्य केले.
 फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.
सावित्रीआई व जोतीबा यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात अस्पृश समाजाच्या व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो.
मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.
आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.
ज्या स्त्रीयांची अज्ञान व गुलामगिरीतुन मुक्तता करण्यासाठी सावित्रीआई हयातभर झगडल्य त्या एक स्वतंत्र प्रज्ञेच्या कवयित्री होत्या त्यांच्या वाड्मयात सामाजिक अन्यायाची जाणीव व्यक्त करणारी कवयित्री त्या काळात त्या पहिल्याच असावी.त्यांचा पहिला काव्यसंग्रह इ.स १८५४ ला शिळाप्रेसवर छापुन प्रसिध्द स्वतःह जोतीबांनी केले. बावनकशी सुबोध रत्नाकर" या काव्यात देशात शुद्रातिशुद्रांनां किती हालअपेष्टा भोगाणाऱ्या साठी जोतीबांनी आपले जिवन कसे समर्पित केले याचे सुरेख चित्रण यात केले आहे.जोतीबांची भाषणे संपादित करुन सावित्रीआई नी जोतीबाच्या कार्यावर सखोल प्रकाश टाकणारा एक मौलिक संदर्भग्रंथच अभ्यासूंना उपलब्ध करुन दिला आहे.
वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.
फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते.
 विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक.
रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक.
मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका.
विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.
त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.
 पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
 १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीआईनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.त्या साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले. १८९६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. दुष्काळातही अशी अन्न्छत्रे चालविली.सर्व बहुजन समाजाची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.
१८९७ साली पुण्यात प्लेगची साथ आली. भितीपोटी लोक पुणे सोडुन पळु लागली तेव्हा सावित्रीआई ने मिल्ट्रीत नोकरी करित असलेल्या आपल्या मुलाला डॉ. यशवंत ला सुट्टी(रजा) काढुन लोकांन साठी रिलीफ कँम्प लावण्याकरिता बोलाविले त्यांच्या दवाखाण्यात एका अस्पृश्य मुलाला वचविण्यासाठी कडेवर घेऊन जात असता त्यांना सुध्दा प्लेगच्या बिमारीची लागण झाली व रस्त्यातच सावित्रीआईचा करुण अंत झाला.वयाच्या ६६ व्या वर्षी सहासी सामाजिकहीत कार्य करित असतांना त्या विरगतीला प्राप्त झाल्यात.
निर्मिके निर्मिला मानव पवित्र |
कमीजास्त सूत्र बुध्दीमध्ये |
पिढीजात बुध्दी नाही सर्वामधीः |
शोध करा आधी पुर्तेपणी |
धर्म राज्य भेद मानवा नसावे |
सत्याने वागावे ईशापाशी |
 भारतीय स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या आद्य प्रणेत्या,कर्त्या समाजसुधारक,थोर शिक्षणतज्ज्ञ राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या१८६ व्या जयंती प्रित्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन व कोटी-कोटी प्रणाम.!!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here