श्रीकांत जिचकार - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 10, 2017

श्रीकांत जिचकार

श्रीकांत जिचकार
एकच माणूस डॉक्टर व वकिलही* होता, 
तो *आयपीएस*अधिकारी , *आयएएस* अधिकारी  याशिवाय तो *पत्रकार,  *किर्तनकार*, *आमदार*,
*खासदार* आणि *मंत्रीही*ही* होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे""- श्रीकांत जिचकार""
होय.
"श्रीकांत जिचकार" यांचं नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यु झाला.
याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील ‘ *महामेरू* ’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे
श्रीकांत जिचकार होय.
अवघ्या
*49 वर्षांचं जीवन*,
*42 विद्यापीठं, 20 पदव्या* आणि
*28 सुवर्णपदकं*
असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.
आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम
असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच
पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये
*एमबीबीएस* आणि *एमडी*,
*एलएलबी*, *एलएलएम*, *डीबीएम*
आणि *एमबीए*, *जर्नालिझम* यांचा समावेश आहे.
जिचकरांनी *10 विषयांत एम.ए*. केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र,
अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी,
राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व,
मानसशास्त्र यांचा समावेश आहे.
जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची *डी.लिट*
ही पदवी मिळवली.
जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून
मिळवल्या आहेत.
श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित
व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने,
ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच
आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष
वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.
जिचकार यांनी 1978
साली यूपीएससीची परिक्षा दिली.
यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे
दोनच वर्षात म्हणजे 1980
साली त्यांनी आयएएसची पदवी देखिल घेऊन
टाकली.
जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये *५२,००० पुस्तकांचा संग्रह* आहे.
विधानसभेची निवडणूक
लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.
या बुद्धिवंताने वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक
निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र
विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून
गेले. *महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार*होते.
जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले.
एकेकाळी त्यांच्याकडे *१४ खात्यांचा कारभार* होता.
यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली.
१९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
जिचकार *१९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य* होते. या काळामध्ये
त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले.
त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम
केले.जिचकार यांचा जन्म नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याश्या गावात झाला. जगातील सर्वात हुशार 10 (Brilliant) स्टूडेंट मधे पहिल्या 1 क्रमांकामधे बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करुन मार्गदर्शन केले. डॉ.जिचकार यांनी जगातले पहिले कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपुर येथे सुरु करुण जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला.त्यांच्या मरणोपरांत त्यांचा परिवार नागपुरला वास्तव्यास आहे.
*संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकार कर्मयोगि अवलीयास सलाम*...

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here