what is android root in marathi - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 12, 2017

what is android root in marathi


what is android root? in marathi. 

*अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे नक्की काय?*


अँड्रॉइड रूट करणे हि एक प्रक्रिया आहे जी अँड्रॉइड ओ. एस. वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोन, टॅबलेट पी.सी. वरील संपूर्ण ताबा मिळून देते. रुटींगमुळे मोबाईल फोन कंपनीने फोन तयार करताना फोनवर घातलेल्या बहुतेक सर्व बंधानांवर वापरकर्त्याला ताबा मिळवता येतो तसेच काही उपयोजने (Applications) इन्स्टॉल करता येतात ज्यासाठी व्यवस्थापक (Administrator) दर्जाची आवश्यकता असते.

*अँड्रॉइड फोन रूट कसा करावा?*

अँड्रॉइड फोन रूट करण्यासाठी इंटरनेटवर खूप वेब साईट्स आहेत ज्या तुम्हाला तुमचा फोन रूट करण्यासाठी उपयोजने पुरवत असतात. त्यांपैकी काही उपयोजनांची माहिती आपण आज जाणून घेऊ.
अँड्रॉइड फोन रूट करणे हे वेगवेगळ्या मोबाईल हँडसेटवर आणि अँड्रॉइडच्या आवृत्तीवर अवलंबून असते. त्यामुळे रूट करण्याआधी तुमचा अँड्रॉइड फोनची आवृत्ती तसेच तुमचा मोबाईल हँडसेट कोणता आहे हे जाणून रूट करावा. रूटींग उपयोजन तुमच्या मोबाईल मध्ये छोटासा फेरबदल करते आणि सुपर युजर (Super User ) नामक उपयोजन इन्स्टॉल करते. ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थापनाचे (Administrator Level) सर्व अधिकार मिळतात ज्याने तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुम्हाला हवे तसे बदल करू शकता. रूट करण्याच्या आधी तुम्हाला "USB Debugging" हे पर्याय चालू करावे लागेल ते तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये सापडेल.

१. "झेड-४-रूट" (z४root) :
जर तुमचा मोबाईल हँडसेट खालीलपैकी असेल तर तुम्ही हे उपयोजन (Application ) वापरू शकता.
(Samsung Galaxy S (All variants), Backflip, Sony X10, Xperia Mini, Droid 2, Galaxy Tab, Galaxy I5700, Galaxy 3 I5800, Droid X, Samsung Acclaim, Cricket Huawei Ascend, Motorola Cliq, Huawei 8120, HTC Hero, HTC G1, Optimus T, Motorola Droid 1, Garmin Asus A50, Motorola Defy, LG Ally, Motorola Flipside, Motorola Milestone 2, Dell streak, X10 Mini Pro, Smartq v7 android 2.1, Dell XCD35/ZTE Blade).

हे उपयोजन १००% खात्रीलायक व सुरक्षित आहे त्यमुळे तुमचा फोन खराब होण्याची शक्यता नाही. तसेच ह्या उपयोजनामध्ये टेंपररी रूट (Temporary Root ), परमनंट रूट (Permanant Root ), रि-रूट (Re-root ) व अन-रूट (Un-root ) असे काही महत्वाचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त टेंपररी रूट किंवा परमनंट रूट वर क्लिक करायचे आहे. रूट वर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन ५ मिनिटांत रि-स्टार्ट होतो आणि तुमचा फोन रूट होतो. टेंपररी रूट केला तर तुमचा फोन तात्पुरता रूट होईल आणि जेव्हा तुम्ही तुमचा फोन रि-स्टार्ट कराल तेव्हा तुमचा फोन पूर्वस्थितीत होईल. परमनंट रूट मध्ये तुमचा फोन कायमचा रूट होईल. तुमचा फोन जर रूट झाला असेल पण रूट व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही रि-रूट वर क्लिक करून पुन्हा रूट करू शकता. जर तुम्हाला तुमचा फोन पूर्वस्थितीत करायचा असेल तर तुम्हाला अन-रूटवर क्लिक करावे लागेल.

*अँड्रॉइड फोन रूट करण्याचे तोटे.*

(अ) तुमचा फोन खराब होऊ शकतो:

जर तुम्ही रूट करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पाळली नाही तसेच कोणतीही स्टेप येत नाही म्हणून गाळली तर तुम्हाला तुमचा फोन गमवावा सुद्धा लागू शकतो. शक्यतो अस काही होत नाही कारण आपणच आपल्या फोनबाबत सतर्क असतो. जर असे काही झाल्यास आपला फोन परत मिळवण्यासाठी आपल्याला इंटरनेट वर खूप मदत मिळू शकते तसेच जर आपला फोन वॉरंटीमध्ये असेल तर काहीच चिंता नाही. पण फोन खराब न होण्याची काळजी घेतलेली बरी.

(ब) तुमच्या फोनची वॉरंटीचा शेवट होऊ शकतो:

जेव्हा तुमचा फोन रूट होईल तेव्हा पासूनचा क्षण तुमच्या फोनच्या वॉरंटीचा शेवट ठरू शकतो त्यामुळे सावधान! जर रूट केल्यानंतर तुमच्या फोनला काही झाले तर तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे घालून तुमचा फोन रिपेअर करावा लागेल. काही फोन मध्ये अन-रूट (UN-ROOT) म्हणजेच रूट केलेला फोन पूर्वस्थितीत आणण्याची सुविधा असते त्यामुळे तुमचा फोनची वॉरंटी तुम्ही परत आणू शकता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here