Xiaomi ने लॉन्च केली iphone 7 पेक्षाही स्लिम TV, जाणून घ्या किंमत

Xiaomi ने लॉन्च केली iphone 7 पेक्षाही स्लिम TV, जाणून घ्या किंमत

गॅजेट डेस्क-Xiaomi ने CES 2017 मध्ये Mi TV 4 आणि Mi Router HD लॉन्च केले आहे.हे दोन्ही डिव्हाईस 2017 च्या शेवटीपर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे.Xiaomi चा हा टीव्ही सर्वात स्लिमटीव्ही आहे,असा कंपनीने दावा केला आहे.या टीव्हीमध्ये पाहिल्यावेळेसच डॉल्बी ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर केला असून,तो थिएटर सारखा एक्सपीरियन्स देतो.iPhone7 पेक्षा 30 टक्के स्लिम...

 

कंपनीने असा दावा केला आहे की,हा टीव्ही Mi MIX हून 37 टक्के स्लिम आणि iPhone7 हून 30 टक्के स्लिम आहे.हा टीव्ही 49,55,65inch व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे.यूजर्सला या टेलिव्हिजनला अपग्रेड करायचे असेल तर,मदरबोर्ड आणि दुसरे इंटर्नल्सला बदलू शकतात. 

 

कींमत

 

कंपनीच्या ग्लोबल व्हाईस प्रेसीडेंट ह्यूगो बाराने सांगितले की,या टेलिव्हिजनची किंमत 1,35,000 रुपये असेल.यासोबतच दूसरे मॉडल ज्यामध्ये Dolby Atmos home theatre असणार नाही,त्याची किंमत 102,000 रुपये राहणार आहे. 

हे देखील आहे महत्त्वाचे 

Mi ने म्हटले आहे की,टेलिव्हिजन सोबत लवकरच Mi Router HD चे दोन व्हर्जन लॉन्च करणार आहे.1TB ची कींमत 13,500 आणि 8TB ची 34000 रुपये असून 2600Mbps ट्रांसफर स्पीडला सपोर्ट करेल. 

Post a Comment

0 Comments