Skip to main content

Posts

Showing posts from February, 2017

कभी माँ को आया था बेटी की इस आइडिया पर शर्म, आज बेटी ने उसे बना दिया अरबों का बिजनेस

यह सच है कि महिलाओं के लिए किसी भी कारोबार की शुरुआत कर उसे सफल बनाना चुनौतियों से भरा होता है। लेकिन तमाम बाधाओं का डटकर मुकाबला करते हुए कई महिला उद्यमियों ने उतनी ही शानदार सफलता हासिल की जितनी पुरुषों ने की है। आज की कहानी एक ऐसी ही महिला उद्यमी के बारे में है जिसने बिजनेस की शुरुआत की तो सबसे पहले घर में ही सवाल खड़े हुए। इस लड़की ने अपने अनोखे आइडिया से लाखों महिलाओं की एक बड़ी मुश्किल को चुटकी में हल करते हुए करोड़ों रूपये का कारोबार खड़ी कर ली।आज की कहानी है ऑनलाइन अंडरगारमेंट बेचने के लिए ‘जिवामे डॉट कॉम’ की शुरुआत करने वाली रिचा कर की सफलता के बारें में। जमशेदपुर के एक मध्यम-वर्गीय परिवार में पली-बढ़ी रिचा ने बिट्स-पिलानी से पढ़ाई पूरी करने के बाद ख़ुद की नौकरी छोड़ जिवामे डॉट कॉम की शुरुआत की। रिचा ने जब अपने इस आइडिया को घर में शेयर की तो, सबसे पहले उसे अपनी माँ का विरोध झेलना पड़ा।दरअसल महिलाओं के लिए बाजार में पुरुष दुकानदार से अंडरगार्मेंट खरीदना बेहद कठिन काम होता है। खासकर अपनी जरूरत को उस दुकानदार को समझाने में ही महिलाओं के पसीने छूट जाते हैं। कभी दबी हुई आवाज में अपनी पसंद…

शेअर बाजारातील बोनस शेअर्स म्हणजे काय?

शेअर बाजारातील बोनस शेअर्स म्हणजे काय?
----------------------------------------------------
फ्री SMS चे गौडबंगाल पाहिल्यानंतर फ्री या शब्दावरचा तुमचा विश्वासच उडाला असेल आणि त्याच बरोबर शेअर बाजारामध्ये असे काही तरी भयानक घडत असेल तर शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या निर्णयावर तुम्हाला शंका येत असेल, हो ना?..... तर काळजी नसावी कारण आज जो विषय आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे खरा संपत्ती निर्माण करायचा मार्ग आहे आणि यामध्ये होणारी वाढ आहे त्याला अवाढव्य वाढ म्हणजे मोजता न येणारी वाढ संबोधले जाते. खूप जणांनी एकले असेल की विप्रो या कंपनी मध्ये १९८० साली केलेल्या रु. १०००० गुंतवणुकीचे आज जवळपास ६०० कोटी झाले आहेत, हो ६०० कोटी. आकडा चुकला नाही तो बरोबरच आहे. म्हणूनच तुम्हाला बोललो ना संपत्ती निर्माण करायचा हा मार्ग आहे तर जाणून घेऊया १९८० साली घेतलेल्या १०००० हजाराच्या गुंतवणुकीचे १०० शेअर्सची आज किंमत ६०० कोटी आणि शेअर्सची संख्या जवळपास १ कोटी कशी झाली ते पाहूया.
खूप वेळा आपण शेअर्स बाजारात गुंतवणूक करत नसतानाही शेअर्स बाजारातील बातम्या आज आपल्याकडे पोहचतात. एखाद्या कंपनीने बोनस शेअर्स जाहीर …

शेअर्स स्प्लिट म्हणजे काय?

शेअर्स स्प्लिट  म्हणजे काय?
----------------------------------------------------
काल विप्रो च्या शेअर्स च्या १०० शेअर्स चे १ कोटी शेअर्स  झालेले  हे पाहिलेत. आज शेअर्स स्प्लिट आणि राईट इश्यू शेअर्स म्हणजे काय ते पाहू... शेअर्स स्प्लिट म्हणजे काय?शेअर्स स्प्लिट म्हणजे शेअर्सचे होणारे विभाजन. बहुतेक वेळेला कंपनीच्या शेअर्सची किंमत तिच्या विकासामुळे, वाढलेल्या व्यवसायामुळे, वाढलेल्या नफ्यामुळे वाढलेली असते. पण त्याच वेळेला वाढलेल्या किंमतीचा परिणाम कंपनीच्या शेअर बाजारातील उलाढालीवर हे होतो, खरेदी विक्री कमी होते. अशावेळेला कंपनी आपल्या शेअर्सचे विभाजन करते म्हणजेच शेअर्स स्प्लिट. बजाज फायनान्सचा शेअर १२००० पर्यंत पोहचला होता तेव्हा बोनस आणि स्प्लिट देऊन शेअर १२०० वर आणला गेला. असे शेअर्स स्प्लिट आतापर्यंत खूप कंपन्यांमध्ये झाले आहेत. जसे
• Wipro
• Infosys 
• ONGC
• SBI
शेअर्स स्प्लिटमुळे  कंपनीच्या शेअर्स कॅपिटल मध्ये काहीही बदल होत नाही. शेअर्स मार्केट मध्ये आपल्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्रीची उलाढाल चांगली व्हावी यासाठी मूख्य करून शेअर्स स्प्लिट केले जातात. समजून घेण्यासाठी …

Share trading करत असताना खालील मुद्धे लक्षात ठेवा :

Share trading करत असताना खालील मुद्धे लक्षात ठेवा :
१) स्वत:ला ओळखा (Trading Plan ) : trading चे निर्णय घेताना तुमची सध्याची आथिर्क परिस्थिती (गरज, वेळेचे उद्दिष्ट इ.) आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता माहीत असणे महत्वाचे ठरते. या दोन गोष्टी आथिर्क उद्दिष्ट आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवतात.
२) वास्तववादी व्हा : कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीतून परताव्याची अपेक्षा करताना वास्तववादी अपेक्षा ठेवा. यापूवीर् मिळालेला परतावा केवळ पार्श्वभूमी समजावून देतो, पण भविष्यात त्याची पुनरावृत्ती होईल, याची हमी देत नाही. त्यामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या परिस्थितीत मिळालेला परतावा आणि संबंधित क्षेत्राची कामगिरी तुम्हाला पूर्णपणे समजली आहे, याची खात्री करा.
३) ज्ञान ही शक्ती आहे (Knowledge): ज्ञान गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूवीर् तुम्हाला सजग करते. निर्णय घेण्यापूवीर् आवश्यक तितके प्रश्न विचारून माहिती करून घ्यावी.
४) आधी योजना आखा, नंतर उद्दिष्ट ठरवा (Strategy) : सुरुवातीला संपूर्ण आथिर्क योजना तयार करा आणि त्यानंतर मोघम किंवा बाजारातील परिस्थितीनुसार उद्दिष्ट ठरविण्याऐवजी आथिर्क योजन…

शेअर बाजाराची तांत्रिक बाजू -

शेअर बाजाराची तांत्रिक बाजू -
----------------------------------------------------
शेअर्स बाजाराची तांत्रिक बाजू लेख वाचून खूप जणांनी काही प्रश्न विचारले आणि कळले की अजून काही बाजू स्पष्ट होणे गरजेच्या आहेत. त्यामुळे आजच्या लेखातही शेअर्स बाजारातील अजून काही महत्वाच्या तांत्रिक बाजू आपण पाहणार आहोत.... 1. NSE आणि BSE म्हणजे काय?
NSE आणि BSE ही भारतातील प्रमुख स्टॉक मार्केट आहेत.  BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना १८७५ मध्ये झाली. BSE हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज याची स्थापना १९९२ साली झाली. आज BSE ला ८७४ नोंदणीकृत  ब्रोकर आहेत तर NSE कडे ११०० नोंदणीकृत ब्रोकर आहेत. 2. NSE आणि BSE ही दोनच स्टॉक मार्केट भारतात आहेत का? 
नाही. भारतात एकूण १९ स्टॉक एक्सचेंज आहेत पण NSE आणि BSE ही मुख्य स्टॉक मार्केट आहेत . ९०% पेक्षा जास्त व्यवहार हे ह्या दोन स्टॉक मार्केट मध्ये होतात आणि त्याच बरोबर इतर १७ स्टॉक एक्सचेंज म्हणजे अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, कोलकत्ता स्टॉक एक्सचेंज आणि इतर १५ स्टॉक एक्सचेंज आहेत. 3. SENSEX आणि NIFTY म्हणजे नक्की काय…

शेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके

---------------------------------------------
शेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके
---------------------------------------------
शेअर मार्केट हे असे एक क्षेत्र आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. त्याबद्दलचे ज्ञान कमी आणि खोट्या कल्पनाच जास्त पसरत असतात. त्याप्रमाणेच जेव्हा जेव्हा शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल लोक एक एक भयानक अनुभव सांगतात तेव्हा माझ्या डोक्यात मृगजळाचे चित्र चमकून जाते. कारण प्रचंड उन्हाच्या कडाक्यात अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असताना आणि प्रचंड तहान लागली असताना जवळपास पाणी नसते. अशावेळी दूर कुठेतरी पाणी असल्यासारखे दिसते. आपण धावत तिकडे जातो. तेव्हा कळते की ते पाणी नसून केवळ भास होता. यालाच मृगजळ म्हणतात. तसेच या शेअर बाजारामध्ये सामान्य लोकांना दररोज पैसा मिळेल हे मृगजळ आकर्षित करुन घेत असते. कमी पैशामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी बुद्धी गहाण ठेऊन या मृगजळाच्या मागे धावणारांच्या पदरी निराशा पडते. याउलट काहीजण शेअर बाजार म्हणजे जुगार आहे आणि त्याच्या नादाला सामान्य माणसाने लागू नये असेही कानी कपाळी ओरडून सांगतात. अर्थात या गोष्टीवरचा उपाय कोणी सांगत नाही. त्…