शून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 3, 2017

शून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू

शून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू
 

पुण्यात  भारताचा इंग्लडसोबत पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना. प्रथम फलंदाजी घेत भारताचा संघ ६३/४ असा झुंजत होता, आघाडीचे फलंदाज युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी फारश्या धावा न करताच तंबूत परतले होते. विराट कोहली लढत होता, त्याचवेळी स्थानिक खेळाडू केदार जाधव क्रिझवर आला. काही वेळ स्थिरावल्यानंतर त्यांने इंग्लडच्या गोलंदाजांना त्राही करून सोडले. ७६चेंडूत १२० धावा १२चौकार आणि चार षटकारांच्या माध्यमातून झटपट उभ्या करत जाधव याने संघाला कर्णधार कोहली सोबत सन्मानजनक स्थितीला आणून ठेवले. ३५६धावा फलकावर झळकल्या आणि भारताचा थरारक विजय झाला. मॅन ऑफ द मॅच जाधव यांना  आनंद झाला कारण त्यांच्या शहरात त्यांच्या पालकांच्या समोर हा विजय साकारता आला.

Source: Cricket Country

पहिल्या विजयाची पुनरावृत्ती करताना भारताला इंग्लंडचा पराभव करण्यासाठी ३२१ धावा हव्या होत्या आणि संघ १७३/५असा रेंगाळत होता. मोठ्या प्रमाणात धावांचा वेग हवा होता. पहिल्या फळीचे सारे खेळाडू बाद झाले होते. जाधव खेळायला येण्यापर्यंत संघाच्या आशा संपल्यात जमा झाल्या होत्या. त्यांने आक्रमक खेळी सुरु केली सिमापार चेंडू नेण्याची प्रत्येक संधी तो घेत होता. भारताला त्याने विजयाच्या जवळ नेवून ठेवले आणि पाच धावा हव्या होत्या त्यावेऴी तो धावचित झाला. मात्र त्याने केलेल्या ९० धावा संघाच्या कामी आल्या होत्या.

ही कहाणी आहे या पुण्याच्या सध्याच्या खळबळजनक खेळाडूची, केदार जाधव यांची. जे सध्या भारतीय संघात मधल्या फळीचे फलंदाज म्हणून उदयास आले आहेत.

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा या छोट्या शहरातून आलेल्या यांच्या जीवनाच्या सुरुवातीचा काळ फारसा चांगला नव्हता. त्याचे वडील राज्य वीज मंडळात कारकून होते, आणि जाधव यांना मोठ्या तीन बहिणी आहेत ज्या हुशार विद्यार्थीनी होत्या. शिक्षणाची आवड नसलेल्या जाधव याला नवव्या वर्गात असताना शाळा सोडावी लागली.

सुरुवातीला त्यांनी स्थानिक क्रिकेट क्लब मध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व केले, आणि अथक मेहनत करून महाराष्ट्र संघात १९ वयोगटातल्या संघात २००४मध्ये निवडले गेले. पी वाय सी हिंदू जिमखाना येथे तासंतास सराव करताना जाधव यांना स्थानिक संघात स्थान मिळाले. २०१२मध्ये त्यांनी प्रथमच तिहेरी शतक करत३२७धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमध्ये राज्यात असे करणारे ते दुसरे खेळाडू ठरले होते. २०१३-१४ च्य रणजी स्पर्धेत ते सुपर स्टार झाले. सहा शतकांसह त्यांनी १२२३धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम झाला होता. तर रणजी मधील त्या वेळे पर्यंतचा चौथा सर्वात मोठ्या धावांचा तो विक्रम होता.

महाराष्ट्र संघासाठी दहा वर्षे धावांचे यंत्र म्हणून ते खेळत राहिले, अखेर बीसीसीआयच्या निवड समितीचे त्यांच्याकडे लक्ष गेले, दिल्ली आय पीएल संघ दिल्ली डेअर डेविल्स मध्ये त्यांची २०१३मध्ये निवड झाली तेथे ते २०१५ पर्यंत राहिले. त्या नंतर त्यांना २०१६ मध्ये बंगळूरू रॉयल चँलेंजर्स मध्ये खेळायला मिळाले.

अखेर जाधव यांची जे करण्याची तीव्र इच्छा होती ते करण्यासाठी त्यांना २०१४मध्ये राष्ट्रीय संघात बांग्लादेशच्या विरोधात संधी मिळाली. मात्र त्यांना मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही त्याच वर्षी त्यांना कसोटी सामन्यात श्रीलंकाविरोधात खेळायला मिळाले. तेथे त्यांना शतक झळकविण्यास वेळ लागला नाही त्यांनी ८७ चेंडून ते पूर्ण केले. त्यांनंतर २०१५ मध्येही ते झिम्बावे सोबत शतकी खेळी खेळले.

सध्याच्या इंग्लड विरुध्दच्या सामन्यातही जाधव यांनी दाखवून दिले की ते भारतीय संघाच्या मधल्या फळीचा कणा आहेत, आणि असे खेळाडू आहेत ज्यांची कसोटीच्या क्षणी संघाला गरज आहे. ३२व्या वर्षी त्यांच्या धाव मिळवण्याची आणि कठोर वेळी खेळण्याची धिरोदात्त खेळी आहे हेच जाधव यानी दाखवून दिले आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांचे प्रशिक्षक सुरेद्र भावे म्हणाले की, “त्याला स्वत:ला असे वाटले होते की सहाव्या क्रमांकावर खेळायला येवून त्याने सामन्याचा खूप वेळ वाया घालविला,अश्या जागी तो खेळला जेथे एखादा पराजीत झाला तर त्याची चर्चा विजय मिळाला तरी होत राहते. त्याला माहिती होते की त्याला संधी गमवायची नाही आणि त्याला लढताना पाहताना हे जाणवत होते”.

जाधव यांच्या कहाणीत खूप काही प्रेरणा आहेत, त्यातून हेच दिसते की सराव आणि झोकून देण्याची वृत्ती असेल तर तुम्हाला अपयश मागे खेचू शकत नाही.
.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here