शेअर बाजाराची तांत्रिक बाजू - - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 15, 2017

शेअर बाजाराची तांत्रिक बाजू -

शेअर बाजाराची तांत्रिक बाजू -
----------------------------------------------------
शेअर्स बाजाराची तांत्रिक बाजू लेख वाचून खूप जणांनी काही प्रश्न विचारले आणि कळले की अजून काही बाजू स्पष्ट होणे गरजेच्या आहेत. त्यामुळे आजच्या लेखातही शेअर्स बाजारातील अजून काही महत्वाच्या तांत्रिक बाजू आपण पाहणार आहोत....

1. NSE आणि BSE म्हणजे काय?
NSE आणि BSE ही भारतातील प्रमुख स्टॉक मार्केट आहेत.  BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना १८७५ मध्ये झाली. BSE हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज याची स्थापना १९९२ साली झाली. आज BSE ला ८७४ नोंदणीकृत  ब्रोकर आहेत तर NSE कडे ११०० नोंदणीकृत ब्रोकर आहेत.

2. NSE आणि BSE ही दोनच स्टॉक मार्केट भारतात आहेत का? 
नाही. भारतात एकूण १९ स्टॉक एक्सचेंज आहेत पण NSE आणि BSE ही मुख्य स्टॉक मार्केट आहेत . ९०% पेक्षा जास्त व्यवहार हे ह्या दोन स्टॉक मार्केट मध्ये होतात आणि त्याच बरोबर इतर १७ स्टॉक एक्सचेंज म्हणजे अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, कोलकत्ता स्टॉक एक्सचेंज आणि इतर १५ स्टॉक एक्सचेंज आहेत.

3. SENSEX आणि NIFTY म्हणजे नक्की काय?
BSE चा निर्देशांक SENSEX आहे. SENSEX हा शब्द Sensitive Index या शब्दापासून तयार झाला आहे. (Sens+ex= SENSEX). या मध्ये ३० कंपन्या निवडल्या जातात आणि त्यांच्या रोजच्या चढ-उताराच्या सरासरीवर Sensex  चढतो किंवा उतरतो. NSE चा निर्देशांक NIFTY आहे. Nifty हा शब्द NSE च्या निर्देशांकात Fifty शेअर्स असतात त्यातून (NSE + Fifty = NIFTY) तयार झाला आहे. NSE मध्ये ५० कंपन्या आहेत. हे दोन्हीही निर्देशांक त्यात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या दर ३ सेकंदाच्या हालचालीवर काढला जातो.

4. NSDL आणि CDSL म्हणजे नक्की काय?
साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जसे एखादा मोठा व्यापारी त्याच्याकडे असलेला मालाचा साठा त्याच्या स्टोरेज रूम मध्ये ठेवतो त्याप्रमाणे NSDL आणि CDSL म्हणजे आपण घेतलेले शेअर्स  ठेवण्यासाठी बनविण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक स्टोरेज. आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा ते शेअर्स ट्रेडिंग अकाउंट मधून आपल्या या डिमॅट अकाउंट ला ट्रान्सफर होतात. 

5. शेअर्स पेपर (Physical)  स्वरूपात ठेवणे चांगले कि डिमॅट ?
जसे आज टेलिफोन जाऊन स्मार्टफोन आले तसेच डिमॅट अकॉउंट हे आज काळाची गरज आहे आणि येत्या काळामध्ये सर्व गुंतवणूका या डिमॅट स्वरूपातच येतील. डिमॅट स्वरूपात शेअर सर्टिफिकेट जपून ठेवण्याची गरज उरत नाही. डिमॅट स्वरूपात शेअर्स असल्याने ते विकायला हे सोपे असते. डिमॅट स्वरूपात आपण असंख्य कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करू शकतो. तेच physical  शेअर्स घेणे विकणे यामध्ये खूप वेळ जातो आणि आता शेअर्स विकायचे असतील तर डिमॅट अकाउंटद्वारेचं विकावे लागतात.

6. शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार कसा होतो ?
जेव्हा आपण एखाद्या कंपनी चे शेअर्स खरेदी करतो तेव्हा तुम्ही खरेदी केलेले शेअर्स वेळेवर (टी+२) च्या नियमाप्रमाणे चौथ्या वर्किंग दिवशी डिमॅट ला क्रेडिट होतात आणि झालेल्या व्यवहाराचे पैसे अकाउंट मधून कट होतात तसेच जर शेअर्सची विक्री केली असेल तर विकलेल्या शेअर्सचे पैसे (टी+२) च्या नियमाप्रमाणे चौथ्या वर्किंग दिवशी मिळतात.

7. शेअर्स खरेदी विक्रीमध्ये बँक अकाउंट चे स्थान काय?
शेअर्स खरेदी विक्रीसाठी जेव्हा आपण डिमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्या नावाचे बँक अकाउंट असणे ही एक महत्वाची गोष्ट आहे कारण शेअर्समध्ये होणारे सर्व व्यवहार हे बँकेकडून म्हणजे चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफर या पध्दतीनेच होतात. रोकड व्यवहार कधीही स्टॉक मार्केट मध्ये होत नाहीत. तुमचे बँक अकाउंट ही एकाच लिंक तुमच्या डिमॅट मधील व्यवहारासाठी असते.

एक सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये उतरताना जर त्याच्याकडे योग्य तांत्रिक बाजूंची माहीती असेल तर तो गोंधळलेला ना राहता आत्मविश्वासू असेल. मागील लेख आणि आजचा लेख त्यासाठीच. शेअर बाजारातील महासागरात आपल्या आर्थिक  स्वप्नांना ध्येयामध्ये रूपांतरित करायचे असेल तर आर्थिक शिक्षण घेतले पाहिजे.

धन्यवाद.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here