शेअर्स स्प्लिट म्हणजे काय? - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, February 19, 2017

शेअर्स स्प्लिट म्हणजे काय?

शेअर्स स्प्लिट  म्हणजे काय?
----------------------------------------------------
काल विप्रो च्या शेअर्स च्या १०० शेअर्स चे १ कोटी शेअर्स  झालेले  हे पाहिलेत. आज शेअर्स स्प्लिट आणि राईट इश्यू शेअर्स म्हणजे काय ते पाहू...

शेअर्स स्प्लिट म्हणजे काय?

शेअर्स स्प्लिट म्हणजे शेअर्सचे होणारे विभाजन. बहुतेक वेळेला कंपनीच्या शेअर्सची किंमत तिच्या विकासामुळे, वाढलेल्या व्यवसायामुळे, वाढलेल्या नफ्यामुळे वाढलेली असते. पण त्याच वेळेला वाढलेल्या किंमतीचा परिणाम कंपनीच्या शेअर बाजारातील उलाढालीवर हे होतो, खरेदी विक्री कमी होते. अशावेळेला कंपनी आपल्या शेअर्सचे विभाजन करते म्हणजेच शेअर्स स्प्लिट. बजाज फायनान्सचा शेअर १२००० पर्यंत पोहचला होता तेव्हा बोनस आणि स्प्लिट देऊन शेअर १२०० वर आणला गेला. असे शेअर्स स्प्लिट आतापर्यंत खूप कंपन्यांमध्ये झाले आहेत. जसे
• Wipro
• Infosys 
• ONGC
• SBI
शेअर्स स्प्लिटमुळे  कंपनीच्या शेअर्स कॅपिटल मध्ये काहीही बदल होत नाही. शेअर्स मार्केट मध्ये आपल्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्रीची उलाढाल चांगली व्हावी यासाठी मूख्य करून शेअर्स स्प्लिट केले जातात. समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघू...

समजा XYZ कंपनीचे
शेअर बाजार मूल्य :- १ कोटी
शेअर्स ची संख्या :- १०००
शेअर्स चे मूल्य :- रुपये १०,०००

या कंपनीने जर १:१ शेअर्स स्प्लिट चा निर्णय घेतला तर चित्र कसे असेल ते पहा

शेअर बाजार मूल्य :- १ कोटी
शेअर्स ची संख्या :- २०००
शेअर्स चे मूल्य :- रुपये ५०००

XYZ कंपनीचे मूल्य तसेच राहिले पण शेअर्सची संख्या वाढली आणि शेअर्सची किंमत कमी झाली.

शेअर बाजार एक संघटित बाजार आहे. जिथे शेअर्सचे व्यवहार चालू असतात. बोनस शेअर्स, स्प्लिट ऑफ शेअर्स या गोष्टी कंपन्यांबरोबर शेअर्स होल्डर्सच्याही उपयोगाच्या आहेत. शेअर बाजारातून पैसा कमवायचा विचार केल्यावर या सर्व गोष्टी आपल्याला पुढील प्रवासात भेटणारच तेव्हा हे लेख वाचून सुरुवात करणाऱ्यांना बेसिक माहिती असावी. भेटू पुढील सदरात.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here