Share trading करत असताना खालील मुद्धे लक्षात ठेवा :
१) स्वत:ला ओळखा (Trading Plan ) : trading चे निर्णय घेताना तुमची सध्याची आथिर्क परिस्थिती (गरज, वेळेचे उद्दिष्ट इ.) आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता माहीत असणे महत्वाचे ठरते. या दोन गोष्टी आथिर्क उद्दिष्ट आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवतात.
२) वास्तववादी व्हा : कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीतून परताव्याची अपेक्षा करताना वास्तववादी अपेक्षा ठेवा. यापूवीर् मिळालेला परतावा केवळ पार्श्वभूमी समजावून देतो, पण भविष्यात त्याची पुनरावृत्ती होईल, याची हमी देत नाही. त्यामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या परिस्थितीत मिळालेला परतावा आणि संबंधित क्षेत्राची कामगिरी तुम्हाला पूर्णपणे समजली आहे, याची खात्री करा.
३) ज्ञान ही शक्ती आहे (Knowledge): ज्ञान गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूवीर् तुम्हाला सजग करते. निर्णय घेण्यापूवीर् आवश्यक तितके प्रश्न विचारून माहिती करून घ्यावी.
४) आधी योजना आखा, नंतर उद्दिष्ट ठरवा (Strategy) : सुरुवातीला संपूर्ण आथिर्क योजना तयार करा आणि त्यानंतर मोघम किंवा बाजारातील परिस्थितीनुसार उद्दिष्ट ठरविण्याऐवजी आथिर्क योजनेला अनुसरून स्वतंत्र गुंतवणूक उद्दिष्ट निश्चित करा.
५) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळी गुंतवणूक (Diversification) : उद्दिष्टाचा कालावधी लक्षात घेऊन गुंतवणूक करा. निवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण यासारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करा. कमी कालावधीसाठी हे फंड अस्थिर वाटत असले तरी अपेक्षित असलेली दीर्घकालीन आथिर्क वृद्धी त्यातून निश्चितच मिळेल. त्याचप्रमाणे लघुकालीन उद्दिष्टांसाठी मनी माकेर्ट किंवा कॅश फंडमध्ये गुंतवणूक करा, कारण ते अधिक स्थिर आणि अंदाज वर्तवण्याजोगे असतात.
६) सर्व पैसे एकाच खिशात ठेवू नका : हे अतिशय मूलभूत आणि दीर्घकाळापासून चालत आलेले गुंतवणूक तत्त्व आहे. विविध प्रकारातील गुंतवणुकीतील चढ-उतार एकमेकांंपासून वेगळे असल्याने पोर्टफोलिओमधील जोखीम कमी करण्यात यामुळे मदत होते. जोखीम पूर्णपणे टाळता येत नाही, मात्र विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम मर्यादित ठेवता येते.
७) जोखीम-परताव्यातील संबंध समजून घ्या (Risk Reward Ratio ) : सर्व प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये काही प्रमाणात जोखीम असते. दीर्घकाळात चांगला परतावा देण्याची क्षमता इक्विटी फंडांमध्ये आहे. मात्र, त्यासाठी जोखीम जास्त घ्यावी लागते. आजकालच्या बदलत्या वातावरणात हे लक्षात घ्यायला हवे की, जोखीम म्हणजे पोर्टफोलिओमध्ये काही प्रमाणात लवचिकता असणे.
८) कोणतीही योग्य वेळ नसते (Technical is Must ): बाजारातील योग्य वेळ निवडणे जवळपास अशक्य आहे. गुंतवणूक निर्णय बाजारातील परिस्थितीपेक्षाही आपल्या परिस्थितीचे काळजीपूर्वक विश्लेषण करून घेतले गेले पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे की, लघुकालावधीसाठी तुमच्या समोर असलेली अस्थिरता तुमच्या दीर्घकालीन निर्णयांवर परिणाम करणार नाही. शेवटी गुंतवणूक ही काही १०० मीटरची दौड नसून मॅरेथॉन आहे. इक्विटीच्या बाबतीत सातत्याने गुंतवणूक करणे बाजारातील चढ-उतारांमध्ये फायदेशीर ठरू शकते.
९) भावनांना निर्णय घेऊ देऊ नका (Emotionless) : बाजारातील अनपेक्षित घडामोडींनी भावनाविवश होऊन आपण निर्णय घेऊन टाकतो. आणि बाजारातील वर्तुळाकार पॅटर्न लक्षात घेता, परताव्याविषयी अति-आत्मविश्वासामुळे गुंतवणुकीतील डायव्हसिर्फिकेशन कमी होते आणि फुगा फुटल्यावर तुमच्या परताव्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेताना अधिक काळजी घेतली पाहिजे. परिस्थितीचे सखोल आणि वास्तविक विश्लेषण करणे, गुंतवणूक उद्दिष्ट विचारात घेणे आणि त्यासाठी उपलब्ध कालावधीचा विचार करणे आथिर्क उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी अत्यावश्यक असते.
१०) तोटा सहन करण्यात कमीपणा मानू नका : आपल्यापैकी बहुतांश जणांची तोटा सहन करण्याची, म्हणजेच चूक स्वीकारण्याची तयारी नसते. तोट्यात असलेली गुंतवणूक चांगला परतावा देणार नाही, असे वाटले तर ती विकून टाका. त्यातून धडा घेऊन पुढे जावे.
गुंतवणुकीसंदर्भात कोणताही निर्णय घेताना सध्याच्या गुंतवणूक योजनेवर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार करा. जसाजसा वेळ जातो, तुमच्या आयुष्यात बदल घडत जातात, तसे तुमचे उत्पन्न बदलत जाते. त्यामुळे तुम्हाला ठराविक कालावधीनंतर लक्ष ठेवणे आणि गुंतवणुकीचा आढावा घेणे अत्यावश्यक ठरते. माझ्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलले आहे का? माझी जोखीम घेण्याची क्षमता बदलली आहे का? माझ्या गुंतवणुकीची आतापर्यंतची कामगिरी माझ्या अपेक्षा आणि सेक्टरच्या तुलनेत कशी होती? माझ्या निर्णयात काही बदल करण्याची गरज आहे का? हे प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजे
Post Top Ad
Responsive Ads Here
Wednesday, February 15, 2017

Share trading करत असताना खालील मुद्धे लक्षात ठेवा :
Tags
# post for Startup/udyog
Share This
About ATG NEWS
post for Startup/udyog
Labels:
post for Startup/udyog
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
Author Details
Hi friends,
I am Pradeep working as a asst. teacher in school. Pls fallow on istagram @p.managave
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.