HAND WRITING - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 7, 2020

HAND WRITING


*अक्षर खराब येण्याची कारणे** :-
       
  *१* )* एकाग्रतेचा अभाव 
 *२ )* लेखनाची इच्छा नसणे , कंटाळा येणे , बॉलपेन व जेलपेनने सराव करणे . पेनाच्या मागे टोपन लावून पेनचे वजन वाढते . 
 *३* ) वही , पेन नीट न धरणे . 
 *४ )* आत्मविश्वास नसणे .
 *५* ) मन चंचल असणे .
 *६* ) हात दुखणे .
 *७* ) नियमित लेखनाचा सराव नसणे .
 *८* ) जलद गतीने लेखन करणे . 
 *९* ) अक्षरांचे मुळ स्वरुप माहीत नसणे . 
 *१०* ) अक्षर काढण्याचा क्रम माहित नसणे . 
 *११* ) समजून न घेता फक्त लिहिल्याने अक्षर सराब होते . 
 *१२* ) अक्षरांचे अवयव , काना , मागा वेलांटी नीट योग्य पद्धतीने व काढल्यास .
 *१३* ) प्रयत्न न करणे .
 *१४* ) माझे अक्षर चांगले होणारच नाही अशी नकारघंटा सतत वाजवल्यामुळे अक्षर खराबच राहते . 
 *१५* ) त्याला काय होतयं , मला हे असचं जमतं .
 *१६* ) माझ्या हाताला वळणचं नाही . 
 *१७* ) पहिल्यापासून माझे अक्षर खराबच आहे , ते आता काय सुधारणार.. 
 *१८* ) अक्षर चांगले काढल्याबद्दल न्यूनगंड मनात असणे .
 *१९* ) मनात स्वत:ला बदलण्याची इच्छा नसणे .
✳✳✳✳✳✳✳

 *अक्षर सुंदर काढण्यासाठी काही प्रमुख  उपाय* 
                
 *१* ) एकाच वळणात , समान उंचीचे , योग्य अंतर ठेवून लिहावे.
 *२* ) तुम्हाला सुयोग्य वाटणारे वळण निवडून जाणीवपूर्वक त्याच वळणात प्रत्येक अक्षर, शब्द, वाक्य लिहावे.
 *३* ) सुरुवातीला अक्षर लेखनाची गती कमी ठेवावी. 
 *४* ) अक्षर, शब्द पूर्ण लिहून झाल्यानंतर शिरोरेषा म्हणजे अक्षरवरची रेषा डावीकडून उजवीकडे वहीच्या रेषेवर सलग व सरळ काढण्याचा सराव करावा . 
 *५* ) अक्षर लिहीताना योग्य दिशेने सुरुवात करावी म्हणजे अक्षराचे अवयव योग्य क्रमाने काढावेत . 
 *६* ) अक्षर सुंदर होईपर्यंत सावकाश लिहावे . लेखनीवर नियंत्रण ठेवून लेखन करावे .
 *७* ) प्रथम मोठी व ठळक अक्षरे योग्य पद्धतीने काढण्याचा योग्य सराव करावा ,  
 *८* ) मनापासून प्रयत्न करणे, प्रयत्न करतच राहणे, सातत्याने सराव करतच रहावा, चिकाटी सोडू नये. 
 *९* ) ज्यांचे अक्षर सुंदर आहे त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्याकडून तंत्र शिकावीत. निरीक्षणातून शिकावे. 
 *१०* ) लेखनापूर्वीचा सराव , उभ्या - आडव्या रेषा व इतर अक्षरांचे अवयव यांचा चांगला सराव करुनच अक्षर लेखनाकडे वळावे . 
 *११* ) अक्षर लेखनाचा सराव करण्यासाठी दुरेघी, चाररेघी, आलेख कागद, चौकडी खुणा असलेली वही अक्षरांची उंची , आकार वळण चांगले येण्यासाठी वापरल्यास चांगला फायदा होईल. 
 *१२* )  शुद्ध शब्द, विराम चिन्हे, सुवाच्च हस्ताक्षर हे चांगल्या लेखनाचा मुळ पाया आहेत. हस्ताक्षर सुधारण्यासाठी खूप मेहनत घ्या, कारण प्रथम पडलेली छाप ही शेवटपर्यंत कायम राहते . अभ्यास कौशल्य परिणामकारक होण्यासाठी लेखन कौशल्य खूप महत्त्वाचे असते.
 *१३* ) दोन ओळी अंतर अक्षराच्या उंचीएवढे असावे. दोन शब्दात र अक्षर लिहिता येईल एवढे अंतर असावे. प्रत्येक अक्षर व अंक ५० ते ६० वेळा काढून सराव केला पाहिजे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here